ठाणे : एमआयएमला मुंब्रा येथे मोठा धक्का बसला आहे. मुंब्रा येथील दोन एमआयएमचे उमेदवारांचा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
हसन मुलाणी आणि जमीर सुर्मे या दोन एमआयएमच्या उमेदवारांनी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.
ठाण्यातील एमआयएमला शिवसेना चालवत असल्याचा आरोप करून त्यांनी एमआयएमला सोडचिठ्ठी दिली.