पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत आघाडीचा पेच अखेर सुटलाय. आज झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये आघाडीबाबत सकारात्मक चर्चा झाली.
ज्या जागांवर एकमत आहे तिथं आघाडी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय.
त्यामुळे शहरात 100 जागांवर आघाडी करून काँग्रेस-राष्ट्रवादी मैदानात उतरेल. वाद असलेल्या 62 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल.