नवी मुंबईत जमिनीच्या किंमतीचा उच्चांक, भूखंड विक्रीतून ३१९ कोटी

शहरातील जागेच्या भावानं विक्रम नोंदवलाय. नवी मुंबईमधील सानपाडा पामबीच मर्गावरील सिडकोचा भूखंड चक्क ३ लाख ३९ हजार ३३९ प्रति चौरस मिटरनं विकला गेलाय. सिडकोला चक्क ३१९ कोटी भूखंड विक्रीतून मिळालेत.

Updated: Jun 3, 2016, 10:04 AM IST
नवी मुंबईत जमिनीच्या किंमतीचा उच्चांक, भूखंड विक्रीतून ३१९ कोटी title=

नवी मुंबई : शहरातील जागेच्या भावानं विक्रम नोंदवलाय. नवी मुंबईमधील सानपाडा पामबीच मर्गावरील सिडकोचा भूखंड चक्क ३ लाख ३९ हजार ३३९ प्रति चौरस मिटरनं विकला गेलाय. सिडकोला चक्क ३१९ कोटी भूखंड विक्रीतून मिळालेत.

सानपाडा मोराज सर्कल येथील सेक्टर -१३ मध्ये हा भूखंड आहे. प्लॉट क्रमांक ७-अ या ३ हजार ५० स्क्वेअर मीटरच्या या भूखंडासाठी सर्वात जास्त निविदा आल्या होत्या. अखेर हा भूखंड ३ लाख ३९ हजार ३३९ प्रति चौरस मिटर या विक्रमी किंमतीत अक्षर डेव्हलपरनं विकत घेतलाय. त्या खालोखाल नेरुळमधील दोन भूखंडांची विक्री झाली. 

नेरुळ सेक्टर १३ मधील ७-अ हा १ हजार ४५६ एरियाचा भूखंड एक लाख ६४ हजार चौरस मिटर या किमतीला विकला गेला. भगवती ग्रुपनं हा भूखंड खरेदी केला. तर दुसरा ७-बी आ भूखंड एक लाख ७३ हजार ६०० प्रति चौरस मिटर या किमतीत विकला गेला.

सिडकोनं १६ तारखेला या चारही भूखंडांच्या विक्रीसाठी जाहिरात काढली होती. गुरूवारी त्यांचं टेंडर सबमिशन आणि ओपनिग होतं. या चारही भूखंडांमुळे सिडकोला तब्बल ३१९ कोटी रुपये मिळणार आहेत.