येवला: शस्त्रांचा धाक दाखवून ११ तोळे सोनं, ३० हजारांची लूट

येवला तालुक्यात दरोडेखोरांनी धुमाकुळ घातलाय. तालुक्यातील अंगुलगाव इथं ५ ठिकाणी सुमारे १५ ते २० दरोडेखोरांनी शेतकऱ्यांना मारहाण करीत घातक शस्त्रांचा धाक दाखवून ११ तोळे सोने अन् ३० हजारांची लूट केली आहे. 

Updated: Apr 26, 2015, 10:55 AM IST
येवला: शस्त्रांचा धाक दाखवून ११ तोळे सोनं, ३० हजारांची लूट title=

नाशिक: येवला तालुक्यात दरोडेखोरांनी धुमाकुळ घातलाय. तालुक्यातील अंगुलगाव इथं ५ ठिकाणी सुमारे १५ ते २० दरोडेखोरांनी शेतकऱ्यांना मारहाण करीत घातक शस्त्रांचा धाक दाखवून ११ तोळे सोने अन् ३० हजारांची लूट केली आहे. 

मध्यरात्री १२.३० च्या सुमारास कचरू नामदेव जगझाप यांच्या घरावर प्रथम दरोडा पडला. दरोडेखोरांना दगड, कुऱ्हाडीच्या साह्यानं दरवाजा तोडून घरात प्रवेश मिळवला. त्यानंतर दयानंद सुकदेव झाल्टे, राजेंद्र सुकदेव झाल्टे, चांगदेव जगझाप, करुणा राजेंद्र झाल्टे यांच्या घरांकडे दरोडेखोरांनी आपला मोर्चा वळवला. 

दरोडेखोरांच्या मारहाणीत प्रविण झाल्टे जखमी झालेले आहेत. तालुका पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस पथकासह अंगुलगावकडे धाव घेतली. पोलिसांचा सुगावा लागताच दरोडेखोर पसार झाले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.