नाशिक : नाशिक जिल्हा रुग्णालयातील स्त्री रोग तज्ञ वर्षा लहाडे यांच्या रुग्णालयावर उच्चपदस्थ समितीने धाड घातलीय. शासकिय रुग्णालयातील भ्रुण हत्या प्रकरणात वर्षा लहाडेंसह अनेक डॉक्टरांचा सहभाग असल्याने ही कारवाई झालीय.
या प्रकरणाचा अहवाल आरोग्यमंत्र्याकडे देण्यात येणार आहे. या धाडसत्रामुळे भ्रुणहत्या प्रकरणातील अनेक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे. अनेक डॉक्टरांचाही यात समावेश असल्याच्या शक्यताही या निमित्ताने वर्तवण्यात येतेय.