नाशिकच्या प्रेसमध्ये दहा तारखेनंतर साडेबावीस कोटी नोटांची छपाई

देशातील चलन कल्लोळ संपविण्यासाठी नाशिक शहरातील करन्सी प्रेसमध्ये सातत्याने नोटांची छपाई सुरु आहे.

Updated: Nov 26, 2016, 05:57 PM IST
नाशिकच्या प्रेसमध्ये दहा तारखेनंतर साडेबावीस कोटी नोटांची छपाई title=

नाशिक : देशातील चलन कल्लोळ संपविण्यासाठी नाशिक शहरातील करन्सी प्रेसमध्ये सातत्याने नोटांची छपाई सुरु आहे. यात प्रामुख्याने पाचशेच्या नोटा आहेत. आतापर्यंत या प्रेसमधून पाचशेच्या सात कोटी 90 लाख , शंभराच्या सहा कोटी आणि विसच्या एक कोटी नोटा विविध राज्यात गेल्या आहेत.

केवळ दहा तारखेनंतर प्रेसच्या कर्मचा-यांनी एकूण साडेबावीस कोटी नोटा छापून विक्रम नोंदविला आहे. यात त्रिवेंद्रम, अहमदाबाद आणि कोलकात्याला एअर फोर्सच्या मदतीने पहिल्यांदाच नोटा पाठविण्याचे काम याच प्रेसच्या मदतीने झाले. आर्थिक संकटाच्या या काळात अहोरात्र केलेल्या या कामामुळे नाशिक प्रेस कर्मचार्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.