नाशिक : जिल्हा रुग्णालयातील स्त्री रोग तज्ज्ञ वर्षा लहाडे यांच्या रुग्णालयावर उच्चपदस्थ समितीनं धाड घातलीय. शासकीय रुग्णालयातच भ्रुण हत्या केली जात असल्याचं यानिमित्तानं समोर आले.
शासकीय रूग्णालयातच 200 हून अधिक भ्रुण हत्या झाल्याचा संशय आहे. या प्रकरणात वर्षा लहाडेंसह अनेक डॉक्टरांचा सहभाग असल्यानं ही कारवाई झालीय.
गेल्या दोन वर्षांपासून कुठलीही परवानगी न घेता खासगी दवाखाना थाटून सोनोग्राफी करण्यात येत होती. या प्रकरणाचा अहवाल आरोग्यमंत्र्याकडे देण्यात येणार आहे.
या धाडसत्रामुळं भ्रुण हत्या प्रकरणातील अनेक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे. सरकारी रुग्णालायत स्त्री भ्रुण हत्या होत असल्याचे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.