सीसीटीव्ही फुटेज : पोलिसांची दादागिरी कॅमेऱ्यात कैद

नांदेडमध्ये चहाचं हॉटेल उशीरापर्यंत सुरू ठेवल्याच्या कारणावरुन पोलिसांनी हॉटेल चालक, नोकर आणि ग्राहकांना बेदम मारहण केली. 

Updated: Nov 4, 2016, 11:00 PM IST
सीसीटीव्ही फुटेज : पोलिसांची दादागिरी कॅमेऱ्यात कैद  title=

नांदेड : नांदेडमध्ये चहाचं हॉटेल उशीरापर्यंत सुरू ठेवल्याच्या कारणावरुन पोलिसांनी हॉटेल चालक, नोकर आणि ग्राहकांना बेदम मारहण केली. 

हा सारा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. रेल्वे स्टेशन परिसरात चहाचे हॉटेल उशिरापर्यंत सुरू होतं. गस्तीवर असलेले वजीराबाद ठाण्याचे पोलीस कर्मचारी या ठिकाणी आले.

हॉटेलमध्ये घुसून शटर बंद करुन दिसेल त्याला मारायला एका पोलिसानं सुरुवात केली. पोलिसांची ही दबंगगिरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. 

रेल्वे स्टेशन असल्यानं या ठिकाणी काही चहाची हॉटेल्स रात्री उशिरापर्यंत सुरु असतात. विशेष म्हणजे, याच परिसरात एक बियर बार रात्रभर सुरू असतो. याची माहिती असूनही त्या बारमध्ये जाऊन पोलीस करावाई करत नाहीत.

पोलिसांच्या मारहाणी बाबतची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. मात्र, अजूनही तक्रारीची दाखल घेण्यात आलेली नाही. दरम्यान, पोलिसांनी मात्र कुठलीही प्रतिक्रीया देण्याचं टाळलंय.