गणवेशासाठी विद्यार्थिनीनी केली आत्महत्या

गणवेश न घातल्याने शिक्षिकेने वर्गाबाहेर काढले म्हणून एका विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड मध्ये घडली आहे. 

Updated: Aug 14, 2016, 09:40 PM IST
गणवेशासाठी विद्यार्थिनीनी केली आत्महत्या  title=

नांदेड : गणवेश न घातल्याने शिक्षिकेने वर्गाबाहेर काढले म्हणून एका विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड मध्ये घडली आहे. नांदेड शहरातील यशवंत नगरमधील विवेकवर्धीनी विद्यालयातील ही घटना आहे.

इयत्ता 8 वी मध्ये शिकणारी संध्या सोनकांबळेला वर्गशिक्षिकेने गणवेश न घातल्याने वर्गाबाहेर काढले होते असा आरोप होत आहे. गणवेश न घातल्याच्या कारणाने विद्यार्थीनाला बाहेर काढण्यात आले. अपमान सहन न झाल्याने 13 वर्षीय संध्याने शनिवारी दुपारी शाळेतून परतल्यानंतर राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप होत आहे.

उपचार सुरू असतांना संध्याचा शनिवारी संध्याकाळी मृत्यू झाला. नातेवाईकांच्या फिर्यादीवरुन शाळेच्या शिक्षिका पिंगळीकर यांच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.