'शिवकाळ किंवा एखाद्या क्तिमत्वावर चित्रपट काढण्याची इच्छा'

आयुष्यात कधीतरी शिवकाळ अथवा शिवकाळातल्या एखाद्या व्यक्तिमत्वावर चित्रपट काढण्याची इच्छा

Updated: May 14, 2016, 10:13 PM IST
'शिवकाळ किंवा एखाद्या क्तिमत्वावर चित्रपट काढण्याची इच्छा' title=

पुणे : आयुष्यात कधीतरी शिवकाळ अथवा शिवकाळातल्या एखाद्या व्यक्तिमत्वावर चित्रपट काढण्याची इच्छा, सैराट फेम नागराज मंजुळे यांनी व्यक्त केली आहे. पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर किल्ल्यावर आयोजित संभाजी महाराज जयंती सोहळ्यात नागराज मंजुळे जाहीर सत्काराला उत्तर देतांना बोलत होते. 

आपण कुठल्याच जातीचे नसून केवळ माणूस असल्याचा नागराज मंजुळे म्हणाले. संभाजी ब्रिगेड नागराज मंजुळे यांच्या पाठीशी असल्याचं, संभाजी ब्रिगेडनं यावेळी सांगितलं. तर संभाजी महराज जयंती कार्यक्रमाला सरकारचा एकही प्रतिनिधी उपस्थित नसल्याची खंत, कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी व्यक्त केली. पुरंदर प्रतिष्ठान आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून, संभाजी महाराज जयंती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.