लोकांना फक्त आर्ची दिसते, कुस्तीपटू साक्षी मलिक नाही - नागराज मंजुळे

ऑलिम्पिकसाठी आपल्या देशात काहीच संघटित प्रयत्न केला जात नसल्याबद्दल आश्चर्य वाटतं असं मत, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केलंय. लोकांना फक्त आर्चि दिसते, मात्र देशाला गौरव मिळवून देणारी ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक दिसत नाही, अशी खंत नागराज मंजुळे यांनी व्यक्त केली.

Updated: Aug 21, 2016, 02:42 PM IST
लोकांना फक्त आर्ची दिसते, कुस्तीपटू साक्षी मलिक नाही - नागराज मंजुळे title=

पुणे : ऑलिम्पिकसाठी आपल्या देशात काहीच संघटित प्रयत्न केला जात नसल्याबद्दल आश्चर्य वाटतं असं मत, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केलंय. लोकांना फक्त आर्चि दिसते, मात्र देशाला गौरव मिळवून देणारी ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक दिसत नाही, अशी खंत नागराज मंजुळे यांनी व्यक्त केली.

पुण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे अंधश्रद्धा या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दुसरीकडे पुण्यातच नाना पाटेकर यांनी ऑलिम्पिकच्या अनुषंगाने, समाजमनावर भाष्य केलं. दर चार वर्षांनी ऑलिम्पिक आल्यावर टीव्ही पुढे बसायचं. पदक मिळाल्यावर कौतुक करायचं आणि नाही मिळालं तर काही तरी विधान करायचं, हे चूक असल्याचं नाना पाटेकर म्हणाले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या जयवंत राठी व्होकेशनल गाईडस अँड ट्रेनिंग इन्स्टिट्युटच्या पदवीप्रदान समारंभात नाना बोलत होते.