कोपरगावात काळे विरुद्ध कोल्हेंची पारंपरिक लढाई

कोपरगाव म्हटल की समोर येते ती काळे कोल्हेंची पारंपारfक लढाई... नगरपालिकेला निवडणूकतही या दोन गटात लढाई असल्याच दिसून येतंय.  

Updated: Nov 23, 2016, 07:59 PM IST
कोपरगावात काळे विरुद्ध कोल्हेंची पारंपरिक लढाई title=

प्रशांत शर्मा, कोपरगाव : कोपरगाव म्हटल की समोर येते ती काळे कोल्हेंची पारंपारfक लढाई... नगरपालिकेला निवडणूकतही या दोन गटात लढाई असल्याच दिसून येतंय. या ठिकाणीही जनतेतुन नगराध्य पदाच्या निवडणुकीलाच जास्त महत्व असल्याच दिसुन येतय भारतीय जनता पार्टीी (कोल्हे) आणि शिवसेनेची येथे युती झाली असुन नगराध्यक्ष पद हे भाजपाला देण्यात आलय तर दुसरीकडे  राष्ट्रवादी काँग्रेस ( काळे ) यांनाही आपाल उमेदवार उभा केलाय तर अटल बिहारा वाजेंपीय बरोबर असेल्या दिवंगत सुर्यभान वहाडणे यांच्या मुलगा विजय वहाडणे याना भाजपाने तिकट नागरल्याने वहाडणेंनी बंड करत नराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. तर काँग्रेसही स्वबळावर निवडणुकीत उतरली आहे शहाराचा पाणीी प्रश्न,सस्ते आणि गटांची लढाई म्हणुनच कोपरगावची नगरपालीेकेची निवडणुक गाजतेय.

कोपरगाववासियांचा कौल कुणाला?

कोपरगाव नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी अशी सुरूय. 28 जागांसाठी होणार असलेल्या या निवडणुकीत सेना-भाजप एकत्र लढतेय. भाजप 18 आणि शिवसेनेला 10 असं जागांचं वाटप झालंय. युतीनं उद्योजक पराग संधान या नवख्या चेह-याला निवडणुकीत उतरवलंय. युतीच्या प्रचारासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांना कोपरगावात आणत राष्ट्रवादीला शह देण्याचा प्रयत्न केलाय.   

तर काळे आणि कोल्हे यांच्या कारभारास वैतागलेल्या आणि भाजपशी गेली 40 वर्षे निष्ठावंत राहूनही उमेदवारी नाकारल्यानं विजय वहाडणे हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. 

राष्ट्रवादीनं कोपरगावचे माजी नगराध्यक्ष माधवराव आव्हाड यांचे नातू विजय आव्हाड यांना उमेदवारी दिलीय. विधानसभेच्यावेळी सेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या माजी आमदार अशोक काळेंचे पुत्र आशुतोष यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी ही निवडणूक लढवतेय.  

गेली 40 वर्षे स्थानिक स्वराज्य संस्था असो आमदारकी...काळे आणि कोल्हेंची सत्ता कोपरगावावर राहिलीय. मात्र तरीसुद्धा शहराचे अनेक प्रश्न सुटलेले नाहीत.  

यावेळी कोपरगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष घालत नगराध्यक्षपदासाठी मिनल खांबेकर यांना उमेदवारी दिलीय. मात्र याठिकाणी काँग्रेस पूर्ण पॅनल उभं करू शकली नाही. त्यांना अपक्षांची साथ घ्यावी लागलीय. दरम्यान मनसेनंही नगरसेवकपदासाठी काही उमेदवार उभे केलेत. तेव्हा आता काळे - कोल्हेंच्या सत्तासंघर्षात कुणाच्या पारड्यात कोपरगाववासीय मतं टाकतात ते येत्या 28 नोव्हेंबरला स्पष्ट होईल.