माझ्या मुला, मुलीचे ट्विटर अकाउंट नाही – राज ठाकरे

माझे, माझ्या मुली आणि मुलाचे कोणाचेही ट्विटर अकाउंट नाही. त्यांच्या नावाने फेक अकाउंट तयार करण्यात आले आहे. उर्वशी नुकतीच हॉस्पिटलमधून आली आहे. पाय धरून बसली आहे. आमच्या घरात कोणीही जात-पात मानत नाही. या ट्विटशी तिचा काहीही संबंध नाही, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खुलासा केला आहे. 

Updated: Nov 18, 2014, 07:39 PM IST
माझ्या मुला, मुलीचे ट्विटर अकाउंट नाही – राज ठाकरे  title=

पुणे : माझे, माझ्या मुली आणि मुलाचे कोणाचेही ट्विटर अकाउंट नाही. त्यांच्या नावाने फेक अकाउंट तयार करण्यात आले आहे. उर्वशी नुकतीच हॉस्पिटलमधून आली आहे. पाय धरून बसली आहे. आमच्या घरात कोणीही जात-पात मानत नाही. या ट्विटशी तिचा काहीही संबंध नाही, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खुलासा केला आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित आणि मुलगी उर्वशी यांच्या नावाने फेक ट्विटर अकाऊंट  काढून  समाजात तेढ निर्माण करणारे ट्विट करण्यात आले होते.  या संदर्भात अमित आणि उर्वशी यांनी पोलीस स्टेशन गाठलंय. 

फेसबुक आणि ट्विटर या सोशल वेबसाईटवर अमित आणि उर्वशी राज ठाकरे या दोघांच्याही नावाने फेक अकाऊंट तयार करण्यात आलेत. या अकाऊंटचा गैरवापर करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रकारही होताना दिसतोय.

हा प्रकार डिसेंबर २०१२ मध्ये उघडकीस आला होता. त्यावेळी, त्यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. पण, त्यानंतर अजूनपर्यंत या फेक अकाऊंटपर्यंतचा निकाल लागू शकलेला नाही... शिवाय यावर वादग्रस्त ट्विटस् सुरूच आहेत. त्यामुळे आता या दोघांनीही मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाकडे धाव घेतलीय. 

तसंच, आपलं फेसबुक किंवा ट्विटरवर कोणत्याही प्रकारचं सोशल अकाऊंट नसल्याचं अमित आणि उर्वशी यांनी स्पष्ट केलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.