अंबरनाथ / बदलापूर : अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होतय.
रणसंग्राम अंबरनाथ नगरपरिषदेचा...
अंबरनाथ नगर परिषदेच्या ५४ प्रभागांसाठी मतदान होणार आहे. एकूण ५७ प्रभाग असलेल्या या नगरपरिषदेत निवडणुकीआधीच ४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आज होणाऱ्या मतदानासाठी शहरात १६५ मतदान केंद्र उभारण्यात आले असून या मतदान केंद्रावर काम पाहण्यासाठी ११०० कर्मचारी नेमण्यात आले आहेत. २२ केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी मतदानासाठीच्या ईव्हीएम मशीन आणि कर्मचारी पोलीस बंदोबस्तमध्ये प्रत्येक केंद्रावर पाठवण्यात आले. मागील सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी प्रभाग संख्या ५० होती. नव्या प्रभाग रचणेनंतर प्रभागांची संख्या वाढून ५७ झाली आहे.
रणसंग्राम कुळगाव बदलापूर नगरपरिषदेचा...
कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या ४७ प्रभागांपैकी ५ प्रभागातील उमेदवार बिनविरोध निवडून गेले आहेत. त्यामुळे ४२ प्रभागांत १५७ उमेदवार रिंगणात आहेत. १ लाख ५२ हजार ७९ मतदार या उमेदवारांचं भवितव्य मशीनबंद करणार आहेत. कुळगाव बदलापूर नगर परिषदेची निवडणूक गेल्या काही दिवसांत घडलेल्या काही घडामोडीमुळे चर्चेचा विषय ठरली आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार न घडता निवडणूक शांततेच्या वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासन तसेच पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे.
कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या ४२ प्रभागांसाठी ११७ मतदान केंद्रात सुमारे ५८५ कर्मचारी तैनात असणार आहेत. बदलापूरची लोकसंख्या १ लाख ७४ हजार २२६ असून त्यापैकी १ लाख ५२ हजार ७९ मतदार आहेत. त्यामध्ये ८२ हजार २३४ पुरुष, ६९८३८ स्त्रिया तसेच ७ इतरांचा समावेश आहे. मागील सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी प्रभाग संख्या ३४ होती नव्या प्रभाग रचनेनंतर ही संख्या ४७ झालीय.
इथेही सुरू आहे मतदान...
भोकर नगरपालिका निवडणूक
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा मतदारसंघ
एकूण जागा - १९
मुख्य लढत - भाजप विरूद्ध शिवसेना युती वि. काँग्रेस
राजगुरूनगर नगरपालिका
एकूण जागा - १८
मुख्य लढत - शिवसेना वि. भाजप
अंबरनाथ नगरपालिका
एकूण जागा - ५७
मुख्य लढत – भाजप वि. शिवसेना
कुळगाव- बदलापूर नगरपालिका
एकूण जागा – ४७
मुख्य लढत – भाजप वि. शिवसेना
वरणगाव (जळगाव)
एकूण जागा – १८
मुख्य लढत- भाजप वि. शिवसेना
वाडी, मोवाड नगरपरिषद निवडणूक
वाडी नगररपालिकेसाठी १६६ उमेदवार
वाडीमध्ये ४३ मतदान केंद्र सज्ज
मोवाड नगरपालिकेसाठी ६६ उमेदवार
मोवाडमध्ये १७ मतदान केंद्र सज्ज
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.