मुंबई लोकलमधून पडून महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू

मुंबई लोकलमधून पडून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या आठवड्यातील ही तिसरी घटना आहे. ही घटना  आज संध्याकाळी ६च्या सुमारास घडली.  डोंबिवली ते दिवा दरम्यान ही घटना घडली. त्यामुळे रेल्वे प्रवास मुंबईकरांच्या जीवावर बेतत असल्याचे दिसून येत आहे. 

Updated: Dec 3, 2015, 11:38 PM IST
मुंबई लोकलमधून पडून महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू title=

ठाणे : मुंबई लोकलमधून पडून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या आठवड्यातील ही तिसरी घटना आहे. ही घटना  आज संध्याकाळी ६च्या सुमारास घडली.  डोंबिवली ते दिवा दरम्यान ही घटना घडली. त्यामुळे रेल्वे प्रवास मुंबईकरांच्या जीवावर बेतत असल्याचे दिसून येत आहे. 

अधिक वाचा : Video - धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न प्राणघातक

मध्य रेल्वेच्या मार्गावर लोकलमधून पडून आशिष शंकर शेणे या १६ वर्षीय या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा बळी गेला. डोंबिवली ते दिवा दरम्यान कोपरजवळ ही दुर्घटना घडली. आशिष हा मित्रांसोबत  डोंबिवलीकडे फिरालयला जात होता. पवईतील रहिवासी शंकर शेणे यांचा तो मुलगा आहे.  

अधिक वाचा : VIDEO : धावत्या रेल्वेतून 'तो' खाली कोसळला 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.