रत्नागिरी : मुंबई - गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. येत्या २४ ऑगस्टला मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाचा शुभारंभ केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली.
काँग्रेस सरकारला जे जमले नाही ते कामही दोन महिन्यांत हाती घेतले आहे. यावेळी राऊत यांनी काँग्रेस नेते आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांना आव्हान दिले. माझ्यावर टीका करणाऱ्या राणे यांना मी कार्यक्रमाचे निमंत्रण देतो. त्यांनी पहिल्या रांगेत बसून कार्यक्रम पाहावा. राणे हे भरकटलेले प्राणी आहेत. त्यांच्या टीकेकडे आम्ही आता दुर्लक्ष करीत आहोत. आम्ही प्रत्यक्ष कामाला सुरुवात करीत आहोत, त्यामुळे ते विचलीत झाले असल्याचा टोला राऊत यांनी राणेंना हाणला.
कोकण रेल्वेमार्गावरील दोन ओव्हरब्रिज आणि बारा नद्यांवरील पुलांच्या कामांचा शुभारंभ आम्ही २४ ऑगस्टला दुपारी ३ वाजता सप्तलिंगी नदीच्या पुलावर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्या उपस्थितीत करत आहोत. २०१७ ला या महामार्गाचे काम पूण होईल, असे राऊत यांनी सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.