मोरगाव : सुशांत कोयटे, श्रीकांत झवर या युवकांच्या झॉन मीडियाने अष्टविनायकांचं आकाशातून दृश्य टिपलं आहे, सुरूवातीला पाहुयात मोरेश्वराचं मोरगाव.
संपूर्ण चराचरांची निर्मिती झाल्यावर ब्रम्हा विष्णू महेश, सूर्य आणि शक्ती यांना प्रश्न पडला की आपली निर्मिती कुणापासून झाली. या प्रश्नाचे उत्तर शोधत त्यांना एक दिव्य तेजस्वी ज्योती ओमरुपी गणेशाचे दर्शन झाले.
त्या दृष्टांतानंतर ब्रम्हांडाच्या शक्तीने आदिपूज्याची जिथे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला जिथे प्रतिष्ठापना केली ते म्हणजे शूस्वानंद भूवन....म्हणजेच आजचं मोरगाव.. तॆ उर्जापीठ म्हणजे मोरगावचा मयुरेश्वर...अष्टविनायक स्पेशलमध्ये याच मोरगावच्या मोरेश्वराचं दर्शन खास तुमच्यासाठी..