हवामान खात्याचा पावसाचा अंदाज

  येत्या ४८ तासात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. 

Updated: Jun 28, 2016, 01:58 PM IST
हवामान खात्याचा पावसाचा अंदाज title=

पुणे :   येत्या ४८ तासात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. 

कोकणात मागील ७२ तासांपासून पावसाचा जोर कायम आहे. मराठवाडा, तसेच विदर्भातील काही भागातही जोरदार वृष्टी झाली. 

उत्तर महाराष्ट्राती जिल्हे मात्र अजूनही कोरडेच आहेत. जळगाव आणि धुळे जिल्ह्यात दुष्काळापेक्षाही वाईट स्थिती आहे.

हमखास पावसाचा बेल्ट समजल्या जाणाऱ्या घाटमाथ्यावरचा पश्चिम महाराष्ट्रात मात्र अजून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल अरबी समुद्राच्या उत्तरी भागात, गुजरात, मध्य प्रदेश तसेच राजस्थानातील काही भागांत होण्यास परिस्थिती अनुकूल असल्याचे वेधशाळेचे निरीक्षण आहे. 

कोकणात  २६ जून रोजीअतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित ठिकाणी हलक्या आणि मध्यम पावसाची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.