पुणे : अंदमानमध्ये ६ दिवस लवकर आलेला मान्सून केरळमध्ये देखील लवकरच धडकण्याची चिन्हं आहेत. एरव्ही एक जूनला केरळमध्ये येणारा मान्सून यंदा ३० मे लाच हजेरी लावण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.
मात्र राज्यात तो वेळेवर येईल की नाही हे पुढच्या काही दिवसातच स्पष्ट होईल असं पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आलं आहे. मान्सून लवकर येत असल्याने शेतकऱ्यांनाही आता मशागतीची तयारी लवकर करावी लागणार आहे.