मनसेनं नाशकात धरली खाजगीकरणाची कास

जकातीच्या खाजगीकरणाला विरोध करत नाशिक महानगर पालिकेच्या सत्तेत आलेल्या मनसेनं आता तीन वर्षानंतर खाजगीकरणाचा सपाटा लावलाय. त्याची सुरवात झालीय खत प्रकल्पापासून... शिवसेनेनं मात्र या विरोधात दंड थोपटले असल्यानं नवा संघर्ष महापालिकेत बघायला मिळणार आहे.

Updated: Mar 9, 2015, 10:25 PM IST
मनसेनं नाशकात धरली खाजगीकरणाची कास title=

नाशिक: जकातीच्या खाजगीकरणाला विरोध करत नाशिक महानगर पालिकेच्या सत्तेत आलेल्या मनसेनं आता तीन वर्षानंतर खाजगीकरणाचा सपाटा लावलाय. त्याची सुरवात झालीय खत प्रकल्पापासून... शिवसेनेनं मात्र या विरोधात दंड थोपटले असल्यानं नवा संघर्ष महापालिकेत बघायला मिळणार आहे.

नाशिक महापालिकेत मनसेच्या सत्तेचापायाच मुळी खाजगीकरणाच्या भूमिकेविरोधात रचला गेला. त्यामुळे नाशिककरांनीही मनसेवर विश्वास टाकला. मात्र आता सगळीकडे खाजगीकरणाचे वारे वाहू लागलेत. नाशिक महापालिकेचा खत प्रकल्प असो, फाळके स्मारक असो किंवा शहरातलं एखादं उद्यान असो, अशा सर्व प्रकल्पांचं खाजगीकरण केलं जाणार आहे. महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केलेल्या प्रस्तावित अंदाजपत्रकात ही त्याचा उल्लेख करण्यात आलाय.

या खाजगीकरणाविरोधात शिवसेना मैदानात उतरलीय. येत्या महासभेत त्यावर सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याचा इशारा शिवसेनेनं दिलाय. 

दीड ते दोन वर्षांनी होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आतापासूनच लोकांना आपापल्या बाजूनं वळवायला सुरुवात केलीय. त्यातला पहिला संघर्ष खाजगीकरणाच्या मुद्यानं समोर आलाय, संघर्षाचे अजून किती  मुद्दे समोर येणार, याची उत्सुकता आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.