पिंपरी-चिंचवड : राज्यातील आमदारांना गरीब झाल्याची जाणीव झाली आणि त्यांनी त्यांच्या पगारात भरघोस वाढ करून घेतली. आता हिच जाणीव पिंपरी चिंचवडमधील नगरसेवकांना झाली आहे. म्हणूनच पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल सातपट वेतन वाढीचा प्रस्ताव विधी समितीत मंजूर करण्यात आला आहे.
काही अपवाद वगळता पिंपरी चिंचवड महापालिकेमधल्या बहुतांश नागरसेवकांकडे चारचाकी गाडी आहे. अनेकांचे विविध व्यवसाय आहेत. साडे सात हजार रुपये वेतन मिळवणाऱ्या या नगरसेवकांनी पन्नास हजार रुपये इतक्या वेतनवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. विधी समितीच्या अध्यक्ष नंदा ताकवणे यांनी आयत्या वेळी विधी समितीमध्ये हा प्रस्ताव मांडला आणि विधी समितीनं तो मंजूरही केला.
विरोधकांकडून याला विरोध होणं अपेक्षित नाहीच. त्यामुळेच मनसे वगळता इतरांनी यावर बोलणे टाळत प्रस्तावाला विरोध दर्शवला. सामाजिक संस्थांनी या वेतनवाढईला विरोध केला आहे. या वेतनवाढीवर पालिका सर्वसाधारण सभेत चर्चा होणार आहे.