कणकवली : सिंधुदुर्गातील कणकवलीचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह सर्व १४ संशयीताना सशर्त जामीन मंजूर करण्यात आलाय.
मात्र सर्व आरोपींना आठवड्यातून बुधवार आणि रविवारी पोस्ट स्टेशनला हजेरी लावावी लागणार आहे. सिंधुदुर्गातल्या कालावल वाळू आंदोलन प्रकरणी वैभव नाईक यांना अटक करण्यात आली होती.
वर्षभरापूर्वी वाळू उपशावरील आंदोलन प्रकरणी कायदा मोडून आंदोलन करण्यात आलं होत. त्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती.