कोल्हापुरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्याला चोपचोप चोपले

संभाजीनगर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या महमद शेख याला नागरिकांनी चांगलाच चोप दिला.

Updated: Sep 30, 2015, 11:00 PM IST
कोल्हापुरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्याला चोपचोप चोपले title=

कोल्हापूर : संभाजीनगर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या महमद शेख याला नागरिकांनी चांगलाच चोप दिला.

महमद हा संभाजीनगर येथील गणेश कॉलनीमध्ये राहतो. अल्पवयीन मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत राहते. मात्र, तिचे आई-वडील मोलमजुरी करण्यासाठी बाहेर गेले होते. या संधीचा फायदा घेत महमदने तिच्यावर जबरदस्ती केली. 

अल्पवयीन मुलगी घरात कोणी नसल्याने ती मैत्रिणीसोबत घेळत होती. तिची मैत्रिण घरी गेल्यानंतर मुलगी महमद शेखच्या दुकानाशेजारी उभी होती. त्यावेळी तिला खाऊचे आमिष दाखवले. तिला दुकानात बोलवून दुकानाचे शटर ओढून घेतले. त्यावेळी त्याने तिच्यावर अतिप्रसंग केला.

हा प्रकार घडताना मुलीने जोरदार आरडा-ओरडा केली. त्यावेळी रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी दुकानाचे शटर उघडले. त्यावेळी महमद हा मुलीवर अतिप्रसंग करताना आढळून आला. हा प्रकार पाहून उपस्थित लोकांचा संताप अनावर झाला. तेथेच त्याला लोकांनी चांगलेच बदडून काढले.

त्याला चोप दिल्यानंतर संभाजीपरिसरातून त्याची धिंड काढली. हा प्रकार जवळ पास दीड तास सुरु होता. पोलिसांना या प्रकारची माहिती मिळताच शेख याला ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.