सावधान ! मुंबई-पुण्यातील दुधाचे नमुने असुरक्षित

सहा शहरांमध्ये अचानक करण्यात आलेल्या दुधाच्या तपासणीत 16 नमुन्यांना फूड अॅंड  ड्रग अॅडमिनिस्ट्रेशने (एफडीए) असुरक्षित ठरविले आहे.  

Updated: Jul 9, 2015, 02:27 PM IST
सावधान ! मुंबई-पुण्यातील दुधाचे नमुने असुरक्षित  title=

मुंबई : सहा शहरांमध्ये अचानक करण्यात आलेल्या दुधाच्या तपासणीत 16 नमुन्यांना फूड अॅंड  ड्रग अॅडमिनिस्ट्रेशने (एफडीए) असुरक्षित ठरविले आहे.  
ह्यात एकूण 121 नमुने घेतले गेले होते. 

'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार मुंबईमधून सगळ्यात जास्त नमुने सापडले आहेत, जे क्वालिटी टेस्टमध्ये फेल गेले आहेत. मुंबईनंतर पुणे आणि साताऱ्याचा नंबर लागतो.

26 मे रोजी फूड सेफ्टीच्या 16 गटांनी  ठाणे, पुणे, सातारा आणि सांगलीच्या मिल्क प्रोसेसिंग यूनिटमध्ये सरप्राइज इंस्पेक्शन केले होते. 

'आम्हाला मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणी 10 नमुने खराब मिळाले. यातील 7 मध्ये पाण्याची भेसळ केली होती, तर बाकी 3 मध्ये स्टार्च मिळाला आहे. हे 3 नमुने माणसाच्या शरीरासाठी घातक आहेत', असे वक्तव्य एफडीएचे कमिशनर हर्षदीप कांबळे यांनी केले आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.