म्हैसाळ गर्भपात प्रकरण : कर्नाटकमधून एकाला अटक

सांगलीतल्या म्हैसाळ गर्भपात प्रकरणी आणखी एक अटक करण्यात आलीय. 

Updated: Mar 8, 2017, 11:38 AM IST
म्हैसाळ गर्भपात प्रकरण : कर्नाटकमधून एकाला अटक title=

सांगली : सांगलीतल्या म्हैसाळ गर्भपात प्रकरणी आणखी एक अटक करण्यात आलीय. 

कर्नाटकच्या कागवाड परिसरात छापा मारुन एका डॉक्टरला अटक करण्यात आलीय. इथल्या डॉ. हरी घोडकेच्या मॅटरनिटी हॉस्पिटलवर छापे मारण्यात आले.

सांगली जिल्ह्यातील पोलिसांनी कर्नाटकात जाऊन ही कारवाई केलीय. या कारवाईत पोलिसांनी दोन सोनोग्राफी मशिन्स आणि कागदपत्रं पोलिसांनी ताब्यात घेतलीत. 

तसंच डॉ. खिद्रापुरेच्या दवाखान्यात काम करणाऱ्या नर्सलाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 

सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ गावात बाबासाहेब खिद्रापुरेच्या हॉस्पिटलजवळ 19  अर्भकांचे अवशेष जमीनत पुरलेल्या अवस्थेत सापडले. तेव्हापासून खिद्रपुरे फरार होता. मिरज ग्रामीण पोलिसांनी त्याला बेळगावमधून अटक केल्यानंतर न्यायालयानं त्याला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय.