स्वातंत्र्यदिनी तहसील कार्यालयासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न

अमळनेरमध्ये एका युवकानं स्वातंत्र्यदिनाला तहसील कार्यालयासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न केला. शहरातल्या अवैध धद्यांविरोधात आवाज उठवत असल्यानं अवैध धंदे करत असलेल्या लोकांनी पोलिसांना हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ या तरुणान आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करत त्याला आत्मदहन करण्य़ापासून रोखलं.

Updated: Aug 16, 2016, 02:14 PM IST
 title=

जळगाव : अमळनेरमध्ये एका युवकानं स्वातंत्र्यदिनाला तहसील कार्यालयासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न केला. शहरातल्या अवैध धद्यांविरोधात आवाज उठवत असल्यानं अवैध धंदे करत असलेल्या लोकांनी पोलिसांना हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ या तरुणान आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करत त्याला आत्मदहन करण्य़ापासून रोखलं.

आत्मदहन करणा-या तरुणाचं नाव अनंत निकम आहे. शहरात सुरू असेले अवैध धंदे, सट्टा, जुगार, कुंटणखाना, अतिक्रमणाविरोधात पोलीस वारंवार दुर्लक्ष करतात. मात्र आपण याविरोधात आवाज उठवत असल्यामुळंच आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करून शहरातून हद्दपार करण्याचा कट असल्याचा आरोप निकम यानं केलाय. मात्र हे आंदोलन होतं की स्टंटबाजी याबाबत शहरात दिवसभर जोरदार चर्चा होती.