माथेरान संघर्ष समितीकडून बंदची हाक

हरित लवादानं 2003 नंतरची बांधकामं तोडण्याचा निर्णय दिला आहे. या निर्णयाविरोधात स्थानिकांनी बंद पुकारला आहे. माथेरान संघर्ष समितीकडून बंदची हाक देण्यात आली आहे.

Updated: Jan 30, 2017, 03:51 PM IST
माथेरान संघर्ष समितीकडून बंदची हाक title=

माथेरान : हरित लवादानं 2003 नंतरची बांधकामं तोडण्याचा निर्णय दिला आहे. या निर्णयाविरोधात स्थानिकांनी बंद पुकारला आहे. माथेरान संघर्ष समितीकडून बंदची हाक देण्यात आली आहे.

शाळा, लॉजिंग,, हॉटेल्स, केबल, रिक्षा, घोडे, टॅक्सी या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचं आवाहन माथेरान संघर्ष समितीनं केलं आहे. माथेरानमध्ये ब्रिटिश काळापासून बाजार प्लॉट आणि माथेरान प्लॉट अशी विभागणी झाली आहे.

बाजार प्लॉटवर स्थानिकांनी घरं बांधली आहेत. माथेरानचा डीपी प्लानही शासनानं मंजूर केलेला नाही. शिवाय 2003 मध्ये माथेरान इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये आल्यानं बांधकामावर निर्बंध आले. दरम्यान 2003 नंतरच्या घरांच्या बांधकामांविरोधात बॉम्बे एनव्हार्यनमेंट ऍक्शन ग्रुपनं पुण्याच्या हरित लवादाकडे तक्रार केली. त्यावरच हरित लवादानं ही बांधकामं तोडण्याचा निर्णय दिला. त्याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जातो. माथेरानमधील 176 अनधिकृत बांधकामांपैकी पहिल्या टप्प्यात 36 बांधकामांवर हातोडा पडणार आहे. दरम्यान या विरोधातच आज माथेरान बंदची हाक देण्यात आली.