औरंगाबाद : मराठवाड्यात वरूणराजा तसा बरसलाच नाही मात्र पैशांचा पाऊस पाडणारा एक बॉक्सर बाबा औरंगाबादेत प्रकटला आहे. पैशांचा पाऊस पाडण्याच्या आमिषानं त्यानं अनेकांन ठगवल्याच पुढं आलय आणि ही फसवणूक करताना काही पोलिसांनीही त्याला मदत केल्याची माहिती पुढं येतय.
तो बाबा जादूने पैशांचा पाऊस पाडण्याचं आणि पैसे चौपट करून देण्याच आमिष दाखवायचा.. लोक पैसे घेऊन आले की, तो जादूचा खेळही मांडायचा.. रात्री या जादुई खेळीची माहिती पोलीसांनाही मिळायची. पोलीस तिथे छापा मारायचे अन् कारवाईची धमकी देऊन सगळे काही घेऊन जायचे. मात्र ही पोलिसांचीच सेटलमेंट असायची अशा पद्धतीने लोकांना लुटणार्या चोर पोलिसांच्या टोळीचा पर्दाफाश औरंगाबादेत झालाय.
ही व्यथा आहे जादूने पैशांचा पावसला बळी पडलेल्या तक्रारदाराची. दुबे यांच्यासह 5 व्यक्तींना बारा लाखांच्या बदल्यात २५ कोटी रुपये करून देतो अस सांगच नारेगावच्या साहेब खान यासीम खान पठाण उर्फ बॉक्सर बाबा या बाबान गंडा घातलाय.. या बाबा विरोधात आता पोलिसांत गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे बाबा फरार झालाय.
ही घटना 3 जुलैचा रात्री आहे. दुबे आणि त्यांच्यासोबत इतर 5 जण पैशांचा पाऊस पाडण्यासाठी औरंगाबादेत आले या सहाही जणांना बॉक्सर बाबाने चिकलठाण्याजवळील एका शेतात नेले. रिंगण बनवून बाबाने खिशातून दोन औषधांच्या बाटल्या काढल्या. बाबा मंत्र पुटपुटू लागताच सिडको एमआयडीसी पोलिसांची एक जीप शेतात धडकली. पाठोपाठ तीन पोलीस उतरले. पोलिसांनी साहित्यासह सर्वांना एन-१ पोलीस चौकीत आणले.
चौकीतून बाहेर पडल्यानंतर दुबे यांनी बाबाला संपर्क साधला असता तुमच्या पैशातून आणलेले औषध पोलिसांनी फेकून दिले आता पैशांचा पाऊस पडणार नाही म्हणत बाबाने पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा ही तर बाबाची टोळी आणि पोलिसांची मिलीभगत लोकांचा लक्षात आली.
बाबाच्या या टोळीत सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला एक फौजदार आणि दोन पोलीस सहभागी असल्याची माहिती पुढे येतेय. जितकी रक्कम अशा पद्धतीने लुटली त्यातील निम्मा हिस्सा हा बाबा त्या पोलिसांना देत होता. अशीही माहिती पुढं आलीये... पोलिसचं असं बाबासोबत मिळून लोकांना गंडवत असतील तर आता विश्वास तरी कुणावर ठेवायचा असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.