अहमदनगरमध्ये मराठा समाजाकडून मूक मोर्चा

कोपर्डी बलात्कार आणि हत्येचा निषेध करण्यासाठी अहमदनगरमध्ये मराठा समाजाकडून मोर्चा काढण्यात आलाय. 

Updated: Sep 23, 2016, 01:41 PM IST
अहमदनगरमध्ये मराठा समाजाकडून मूक मोर्चा title=

अहमदनगर : कोपर्डी बलात्कार आणि हत्येचा निषेध करण्यासाठी अहमदनगरमध्ये मराठा समाजाकडून मोर्चा काढण्यात आलाय. 

अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डीमध्येच तरुणीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यामुळं अहमदनगरमधल्या या मोर्चाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. 

नगरमधील वाडिया पार्क इथून हा मोर्चा निघाला असून स्वस्तीक चौक, चांदणी चौक अशा मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा जाणार आहे.

या मोर्चात अहमदनगर जिल्ह्यातील विविध भागातून मराठा समाजाचे नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झालेत. यात महिला आणि तरुणाची लक्षणीय गर्दी पाहायला मिळतेय. 

या मोर्चासाठी तब्बल १५ हजारांपेक्षा जास्त स्वयंसेवक नेमण्यात आले असून २ हजार पोलीस बंदोबस्तदेखील तैनात करण्यात आलाय. अहमदनगरमधल्या या मराठा मूक मोर्चाला विविध संघटनांनी पाठिंबा दिलाय..