नांदेडमध्ये मराठा समाजाच्या मोर्चाला विराट गर्दी

नांदेडमध्ये मराठा समाजाच्या वतीने मूकमोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.

Updated: Sep 18, 2016, 01:24 PM IST
नांदेडमध्ये मराठा समाजाच्या मोर्चाला विराट गर्दी title=

नांदेड : नांदेडमध्ये मराठा समाजाच्या वतीने मूकमोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. नांदेडच्या नवीन मोंढा मैदानातून निघालेल्या या मोर्चात प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यातल्या 16 तालुक्यातील नागरिक या मोर्चात सहभागी झालेत. यामध्ये महिला आणि मुलींचा सहभाग लक्षणीय आहे. याशिवाय पुरुष, ज्येष्ठ नागरिकांनीही या मोर्चात सहभाग घेतला आहे.

कोपर्डी बलात्कार आणि हत्या घटनेतल्या नराधमांना फाशी द्यावी, मराठा आरक्षण, ऍट्रॉसिटी कायद्यातल्या तरतूदींमध्ये बदल करावा आणि स्वामीनाथन आयोग लागू करावा या प्रमुख मागण्यांसह मराठ समाज रस्त्यावर उतरला आहे.