मनमाड-मालेगाव महामार्गावर तिहेरी अपघात ८ ठार

मनमाड-मालेगाव महामार्गावर कानडगाव शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हल्स, मारुती ओमिनी आणि ट्रकमध्ये झालेल्या तिहेरी भीषण अपघातात ८ जण जागीच ठार झाले तर ९ जण गंभीर झाले. 

Updated: Jun 10, 2015, 01:15 PM IST
मनमाड-मालेगाव महामार्गावर तिहेरी अपघात ८ ठार title=

नाशिक : मनमाड-मालेगाव महामार्गावर कानडगाव शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हल्स, मारुती ओमिनी आणि ट्रकमध्ये झालेल्या तिहेरी भीषण अपघातात ८ जण जागीच ठार झाले तर ९ जण गंभीर झाले. 

मृतांमध्ये एक महिला आणि दोन बालिकांचा समावेश आहे. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला. मालेगावलाच्या भाविकांना सोडल्यानंतर मनमाडच्या दिशेनं टेम्पो ट्रॅव्हल्स निघाला होता. 

याचवेळी मालेगावच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकची बाजू काढण्याच्या नादात प्रवासी वाहतूक करणारी ओमिनी मारुती कार चालकास अंदाज न आल्यानं ट्रक आणि टेम्पो ट्रॅव्हल्समध्ये मारुती ओमिनी सापडून हा विचित्र अपघात झाला.

अपघातात इतका भीषण होता की टेम्पो ट्रॅव्हल्स आणि मारुती ओमिनी गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला. यात ८ ठार आणि ९ जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर उपचार सुरु आहेत. मृतांची नावे समजू शकलेली नाहीत.        

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.