लोकलमधून दोघं पडले, एकाचा मृत्यू

Updated: Jan 20, 2016, 11:44 PM IST
लोकलमधून दोघं पडले, एकाचा मृत्यू title=

मध्य रेल्वेवर प्रवासादरम्यान होणा-या अपघातांची संख्या काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. कळवा आणि ठाणे स्टेशनदरम्यान मंगळवारी सकाळी दोन दुर्घटना घडल्यात. 
कळव्यामध्ये राहणारे ३० वर्षीय बलराम ठाण्याजवळ रुळावर जखमी अवस्थेत आढळून आले. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. गर्दीनं भरलेल्या लोकलमधून बलराम खाली पडल्याचा संशय व्यक्त केला जातोय. 
तर दुस-या घटनेत लोकलच्या दरवाजात उभे असलेले सोमनाथ टाकळकर हे कळवा स्टेशनजवळ पडून जखमी झाले. त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं.