मुख्यमंत्री आणि दानवेंचा निकटवर्तीय सांगून घातला कोट्यवधीचा गंडा

 भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्र्यांचा निकटवर्तीय असल्याचं सांगून अनेकांना कोट्यवधीचा गंडा घालणा-या तोतयाला पोलिसांनी औरंगाबादेत अटक केलीय. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 19, 2017, 09:26 PM IST
 मुख्यमंत्री आणि दानवेंचा निकटवर्तीय सांगून घातला कोट्यवधीचा गंडा   title=

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद :  भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्र्यांचा निकटवर्तीय असल्याचं सांगून अनेकांना कोट्यवधीचा गंडा घालणा-या तोतयाला पोलिसांनी औरंगाबादेत अटक केलीय. 
 
 गणेश बोरसे  असं या इसमाचं नाव आहे, रावसाहेब दानवे यांना या प्रकरणाची कुणकुण लागली. त्यामुळं दानवेंनीच सापळा रचला आणि एका लग्न समारंभात त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधिन केले.. या माणसानं फक्त पैसैच वसूल केले नाहीत तर मुख्यमंत्र्यांच्या नावानं बनावट ऑर्डर काढून लोकांना वितरीत सुद्दा केली आहे... 
 
 बदल्या, अडकलेली सरकारी काम करून देण्याची हमी देऊन गणेश बोरसे लोकांकडून पैसै घेत होता.... अनेक वरिष्ठ सरकारी अधिका-यांना सुद्धा गणेश बोरेसेनं लाखोंचा गंडा घातला होता. तर अनेकांकडून काम करुन देण्याच्या नावाखाली कोट्यवधी जमावल्याची माहिती पोलिसांनी त्यानं दिली.. 
 
 याबाबत त्याचे अजूनही काही साथिदार असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलीय.  उद्या पर्यंत या सगळ्या प्रकऱणाचा उलगडा करणार असल्याचं औरंगाबाद पोलिसांनी सांगितले आहे...धक्कादायक म्हणजे गणेश बोरसेला बनावट नोटा आणि बनावट खत तयार करण्याच्या आरोपाखाली  तीन वर्षांपूर्वी अटक झाली होती.