पुण्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा प्रारंभ

या स्पर्धेसाठी गादी आणि मातीचे आखाडे तयार करण्यात आलेत. यंदा पुन्हा सा-यांच्या नजरा चाळीसगावचा डबल महाराष्ट्र केसरी विजेता विजय चौधरी याच्याकडे असणार आहेत. 

Updated: Dec 7, 2016, 08:52 PM IST
पुण्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा प्रारंभ title=

पुणे :  वारजे गावात प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला आजपासून शुभारंभ होतोय. सचिन दोडके क्रीडा प्रतिष्ठान वतीनं आयोजित या स्पर्धेचं उदघाटन, तुझ्यात जीव रंगला मालिकेतला नायक हार्दिक जोशी याच्या हस्ते होणार आहे. 

या स्पर्धेसाठी गादी आणि मातीचे आखाडे तयार करण्यात आलेत. यंदा पुन्हा सा-यांच्या नजरा चाळीसगावचा डबल महाराष्ट्र केसरी विजेता विजय चौधरी याच्याकडे असणार आहेत. 

2014 आणि 2015 अशा दोन सलग वर्षात विजय चौधरीनं मानाची गदा पटकावत महाराष्ट्र केसरीचा किताब आपल्या नावावर केलाय. 

त्यामुळे विजय चौधरी यंदा महाराष्ट्र केसरीची हॅटट्रिक साजरी करणार का याबाबत सा-यांनाच उत्सुकता आहे. कुस्तीप्रेमींना दहा डिसेंबरपर्यंत डावपेचांचा हा थरार अनुभवता येणार आहे.