www.24taas.com, मुंबई
राज्यातले ६८ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात येणार आहेत. ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस आणि पेरणी झालेले तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त भागात करण्यात येईल. राज्यातल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत उपायोजना करण्यासाठी आज मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलवण्यात आली होती. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलात. मात्र, चारा डेपो बंद करण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आलाय.
राज्यातल्या अनेक तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडलाय. तर अनेक धरणांत शून्य टक्के पाणीसाठा शिल्लक राहिलाय. त्यावर टाकूयात एक नजर...
पावसाची अवकृपा...
- ३ तालुक्यांत २५ टक्के पाऊस
- ४४ तालुक्यांत २५ ते ५० टक्के पाऊस
- ११६ तालुक्यांत ५० ते ७५ टक्के पाऊस
- १२४ तालुक्यांत ७० ते १०० टक्के पाऊस
- फक्त ६८ तालुक्यांत १०० टक्के पाऊस
या धरणांत आहे शून्य टक्के पाणीसाठा...
- मराठवाड्यातील जायकवाडी
- पूर्णा –सिद्धेश्वर
- माजलगांव
- मांजरा
- सिना-कोळेगाव
- निम्न दुधना
- अमरावतीमधील पेनटाकळी
- खडकपूर्णा
- तिसगाव
- सोलापूरमधील उजनी