महाड पूल दुर्घटना : राजापूर - बोरीवली एसटीचा सांगाडा सापडला

महाडमधील सावित्री पुलाच्या अपघातात वाहून गेलेल्या बसचे अवशेष अखेर मिळाले आहेत. 

Updated: Aug 11, 2016, 07:21 PM IST
महाड पूल दुर्घटना : राजापूर - बोरीवली एसटीचा सांगाडा सापडला title=

महाड : महाडमधील सावित्री पुलाच्या अपघातात वाहून गेलेल्या बसचे अवशेष अखेर मिळाले आहेत. नेव्हीच्या सर्च ऑपरेशनला यश आल्याचं म्हटलं जात आहे. हे अवशेष राजापूर-बोरीवली असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

 हे बसचे फोटो २४ तास डॉट कॉमला मिळाले आहेत. फोटोपाहून फोटोच्या वरील टपाचा भाग पूर्णपणे निखळला आहे, एसटीबसचा फक्त खालचा भाग शिल्लक राहिला आहे.

सावित्री नदीत काही प्रमाणात मगर आढळल्याने अवशेष तसेच मृतदेह शोधण्यात अडचणी येत आहे. ढासळलेल्या पुलापासून २५० मीटर अंतरावर हे अवशेष सापडल्याचं सध्या सांगितलं जात आहे.