वर्ध्यात दारुचा महापूर, अर्थमंत्री मुनगंटीवारांना दाखवले काळे झेंडे

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात दारुबंदीचा निर्णय लागू केला. मात्र ते ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या वर्धा जिल्ह्यात गेल्या ४० वर्षांपासून सुरु असलेली दारुबंदी केवळ कागदापूरती मर्यादीत राहिली आहे. प्रत्यक्षात मात्र वर्ध्यात दारुचा महापूर वाहत असल्याच उघडकीस आलंय. तर दुसरीकडे दारू विक्रेत्यांनी त्यांना काळे झेंडे दाखविले.

Updated: Jan 22, 2015, 02:33 PM IST
वर्ध्यात दारुचा महापूर, अर्थमंत्री मुनगंटीवारांना दाखवले काळे झेंडे title=

वर्धा : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात दारुबंदीचा निर्णय लागू केला. मात्र ते ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या वर्धा जिल्ह्यात गेल्या ४० वर्षांपासून सुरु असलेली दारुबंदी केवळ कागदापूरती मर्यादीत राहिली आहे. प्रत्यक्षात मात्र वर्ध्यात दारुचा महापूर वाहत असल्याच उघडकीस आलंय. तर दुसरीकडे दारू विक्रेत्यांनी त्यांना काळे झेंडे दाखविले.

दरम्यान, चंद्रपुरात लागू करण्यात आलेल्या दारूबंदीच्या विरोधात कोर्टात धाव घेण्याची तयारी लिकर लॉबीनं केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करण्याची घोषणा राज्य सरकारनं केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळं दारू विक्रेते प्रचंड नाराज झालेत. 

दारूबंदीच्या निर्णयाला आता कोर्टात आव्हान देण्याची तयारी चंद्रपूर लिकर डिलर्स असोसिएशननं चालवलीय.. दरम्यान, दारूबंदीचा निर्णय लागू झाल्यानंतर प्रथमच चंद्रपूर शहरात आलेल्या पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना, दारू विक्रेत्यांनी काळे झेंडे दाखवले. त्याचवेळी सामाजिक संघटनांनी मुनगंटीवारांचा सत्कार करताना, दूध वाटून आपला आनंद साजरा केला. काळे झेंडे दाखवणाऱ्यांनी दारुबंदीच्या निर्णयाला अपशकून करू नये, असं आवाहन मुनगंटीवार यांनी केलंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.