९० फुट खोल विहीरीत पडलेल्या बैलाला काढले जिवंत बाहेर

देव तारी त्याला कोण मारी. या उक्तीप्रमाणे तब्बल ९० फुट खोल विहीरीत पडलेल्या बैलाला जिवंत बाहेर काढण्यात आले. बैल बाहेर काढण्यासाठी शेतकरी आणि गावकऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे बैलाचे प्राण वाचले. 

Updated: Jul 10, 2015, 11:31 PM IST
९० फुट खोल विहीरीत पडलेल्या बैलाला काढले जिवंत बाहेर title=

लातूर : देव तारी त्याला कोण मारी. या उक्तीप्रमाणे तब्बल ९० फुट खोल विहीरीत पडलेल्या बैलाला जिवंत बाहेर काढण्यात आले. बैल बाहेर काढण्यासाठी शेतकरी आणि गावकऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे बैलाचे प्राण वाचले. 

लातूर जिल्ह्यातील मुरुड येथील किशोर चांडक यांनी नविन आणलेला बैल दुसऱ्या बैलासोबत गोठ्यात झुंजत असताना रात्रीच्या वेळी विहिरित पडला. आणि सुरु झाले 'रेसक्यू ऑपरेशन'या बैलाला वाचवण्यासाठी. 

नविन आणलेला बैल गोठ्यात बांधला होता मात्र या बैलासोबत गोठ्यातील इतर बैलांची काही गट्टी जमली नसल्यानं या बैलांमध्ये गोठ्यातच मध्यरात्रीच्या वेळी चांगलीच झुंज झाली. आणि बैल बांधलेल्या दोरी आणि सिमेंटच्या पाईप सहित शेजारीच असलेल्या ९० फुट खोल विहिरित पडला.  

गावातील मंडळी, जेसीबी मशीन, ट्रॅक्टर हा लवाजमा विहीरिजवळ जमला. अथक प्रयत्नातानंतर बैलाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. बैल जिवंत असल्याचे पाहून ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य आले. त्यानंतर या जखमी बैलावर पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांनीही उपचार सुरु केले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.