खंडाळा बोगद्याजवळ एक्स्प्रेस वेवर दरड कोसळली, वाहतूक ठप्प

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झालीय. खंडाळा बोगद्याजवळ दरड कोसळल्यानं वाहतुकीवर परिणाम झालाय. त्यामुळं वाहतूक जुन्या मार्गावर वळवण्यात आली आहे.

Updated: Jun 22, 2015, 04:03 PM IST
खंडाळा बोगद्याजवळ एक्स्प्रेस वेवर दरड कोसळली, वाहतूक ठप्प title=

पुणे: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झालीय. खंडाळा बोगद्याजवळ दरड कोसळल्यानं वाहतुकीवर परिणाम झालाय. एक्स्प्रेसवेवरील वाहतूक जुन्या मार्गावर वळवण्यात आली आहे.

मुसळधार पावसामुळं एक्स्प्रेस वेवरील वाहतूक आधीच धिम्यागतीनं सुरू असून वाहतुकीची कोंडी होतेय. त्यातच शनिवार-रविवारची सुट्टी आटोपून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. त्यामुळं एक्स्प्रेस वेवर प्रचंड वाहतूक असते. 

मात्र आज खंडाळा बोगद्याजवळ दरड कोसळल्यामुळं मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.