माळशेज घाटात दरड कोसळली, वाहतुकीला खोळंबा

माळशेज घाट दरड कोसळल्यानंतर दोन दिवस बंद राहण्याची शक्यता असताना, आज सोमवारी सकाळी पुन्हा दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

Updated: Jul 4, 2016, 01:51 PM IST
माळशेज घाटात दरड कोसळली, वाहतुकीला खोळंबा title=

पुणे : माळशेज घाट दरड कोसळल्यानंतर दोन दिवस बंद राहण्याची शक्यता असताना, आज सोमवारी सकाळी पुन्हा दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

माळशेज घाटात जोरदार पाऊस होत आहे, त्यामुळे दरड कोसळली असल्याचं सांगण्यात येतंय. यामुळे मार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे, दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. 

मार्गावरील वाहतूक आणखी दोन दिवस ठप्प राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरड हटविण्याचे काम प्रशासनाकडून युद्ध पातळीवर सुरु आहे. मात्र, पावसामुळे कामात अडथळे येत आहेत.