शाळेजवळ तरूणीचा नग्नावस्थेत मृतदेह आढळला

वसईत एका शाळेच्या मागील बाजूस शेतात, तरूणीचा नग्नावस्थेत मृतदेह आढळला आहे. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याचं सांगण्यात येत आहे. वसईच्या विद्या विकासनी शाळेच्या आवारात हा मृतदेह सापडलाय.

Updated: Jul 4, 2016, 12:28 PM IST
शाळेजवळ तरूणीचा नग्नावस्थेत मृतदेह आढळला title=

वसई : वसईत एका शाळेच्या मागील बाजूस शेतात, तरूणीचा नग्नावस्थेत मृतदेह आढळला आहे. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याचं सांगण्यात येत आहे. वसईच्या विद्या विकासनी शाळेच्या आवारात हा मृतदेह सापडलाय.

या तरूणीचं वय अंदाजे २५ ते ३० वर्ष असेल. विद्या विकासनीच्या आवारात काही मुले क्रिकेट खेळत होती. खेळताना त्यांचा बॉल शाळेच्या कंपाऊंडच्या बाहेर गेला, बॉल आणण्यासाठी गेलेल्या मुलांना हा मृतदेह दिसला.

पोलिसांनी ही हत्या असल्याचं सागितलं आहे. या मुलीचा बलात्कार करुन, तिची हत्या केल्याचा अंदाज आहे. तर तरुणीचा मृतदेह ज्या ठिकाणी सापडला, तिथे जवळच एक रुमही आहे. त्यामुळे हे काम कोणा एका व्यक्तीचं नाही, यात ४ ते ४ जणांचा सहभाग असू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.