नारायण राणेंची प्रतिष्ठा पणाला

अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणा-या सिंधुदुर्गमधील कुडाळ नगरपंचायतीसाठी मतदान होतंय. नगरपंचायतीत 17 जागा असून 55 जण रिंगणात आहेत.

Updated: Apr 17, 2016, 01:49 PM IST
नारायण राणेंची प्रतिष्ठा पणाला title=

सिंधुदुर्ग : अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणा-या सिंधुदुर्गमधील कुडाळ नगरपंचायतीसाठी मतदान होतंय. नगरपंचायतीत 17 जागा असून 55 जण रिंगणात आहेत.

हा मतदार संघ नारायण राणे यांचा मतदार संघ मात्र गेल्या निवडणुकीत नारायण राणे यांना इथून शिवसेनेच्या नवख्या वैभव नाईक यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळं साहजिकच या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झालंय. राणे यांनी मतदारसंघात प्रचार यंत्रणा राबवत प्रचाराची रंगत वाढवली. 

यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र लढत असल्याने रंगत वाढलीय. दुस-या बाजूला शिवसेना भाजप मात्र स्वतंत्र लढतायत. भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी गेला महिनाभर जिल्ह्यात तळ ठोकला होता. सेनेची बाजू स्वतः केसरकर सांभाळत होते.. जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलली आहेत. या पार्श्वभूमीवर ही निवडणूक महत्वाची मानली जातेय. मतदानानंतर सोमवारी मतमोजणी होणार आहे.