धक्कादायक : फॅब इंडियात चेंजिंग रूमबाहेर मोबाईल शुटिंग

केंद्रीय मंत्री स्मृर्ती इराणी यांचे प्रकरण ताजे असतना असाच प्रकार कोल्हापुरात उघडकीस आला होता. कोल्हापुरातील ताराबाई पार्क येथील फॅब इंडिया या शोरूम मध्येच हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली होती.

Updated: Apr 6, 2015, 05:53 PM IST
धक्कादायक : फॅब इंडियात चेंजिंग रूमबाहेर मोबाईल शुटिंग  title=

कोल्हापूर : केंद्रीय मंत्री स्मृर्ती इराणी यांचे प्रकरण ताजे असतना असाच प्रकार कोल्हापुरात उघडकीस आला होता. कोल्हापुरातील ताराबाई पार्क येथील फॅब इंडिया या शोरूम मध्येच हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली होती.

फॅब इंडियाच्या शोरूममध्ये एक तरुणी खरेदी करण्यासाठी आली होती. पसंद  पडलेले कपडे ट्रायल रूम मध्ये घालून पाहत असताना या शोरूमचा एक कर्मचारी तिचे मोबाईलवर शुटींग करत असताना हा प्रकार उघडीकस आला. हा कर्मचारी कशाप्रकारे शुटींग करत होता हे CCTV मध्ये कैद झाल. कोल्हापूर पोलीसांनी हे CCTV फुटेज ताब्यात घेतलं असून कसून चौकशी सुरू आहे.

पाहा तो धक्कादायक व्हिडिओ...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.