मुंबई : कल्याण डोंबिवलीचे सर्व निकाल हाती आले असून यात कोणत्याही पक्षाला बहूमत मिळालेले नाहीत. शिवसेना 52 जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष झाला आहे तरी संपूर्ण बहूमत मिळविण्यात अपयश मिळाले आहे.
एकूण आकडेवारीवर नजर टाकली असता 122 पैकी 120 जागांचे निकाल हाती लागले आहेत. यातील 2 जागांवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे शिवसेना-52, भाजप-42, मनसे-9, काँग्रेस-4, राष्ट्रवादी - 2 आणि इतर 11 जागा मिळविल्या आहेत.
त्यामुळे सत्तेचे समिकरण मांडले तर मनसे ज्या पक्षाला पाठिंबा देईल, त्याची सत्ता कल्याण महापालिकेत येणार आहे.
कल्याण डोंबिवलीत मॅजिक फिगर 62 असून हा आकडा कोणालाही पार करता आलेला नाही. त्यामुळे दोन समिकरणात मनसेचा रोल खूप महत्त्वाचा आहे. पण भाजप सेनेने युती केली तर मनसे विरोधी पक्षात बसेल.
त्यामुळे काय समीकरणं होऊ शकतात पाहू या
पहिलं समिकरण - शिवसेना-52 + भाजप-42 = एकूण 94
दुसरं समिकरण - शिवसेना-52 + मनसे-9 + इतर 11 = एकूण 72
तिसरं समिकरण - भाजप-42 + मनसे-9 + इतर 11 = एकूण 62
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.