कुर्कुरेमधील शिट्टीसाठी चिमुकल्याची आत्महत्या

कुर्कुरेच्या पुड्यात निघालेल्या शिट्टीसाठी दोन भावांत भांडण झालं, यात एकाने रागात विषारी औषध प्राशन केले होते. घरच्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी उपचारासाठी जिल्हारुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान सदरील मुलाचा मृत्यु झाला. 

Updated: Jul 28, 2016, 06:45 PM IST
कुर्कुरेमधील शिट्टीसाठी चिमुकल्याची आत्महत्या title=

बीड : कुर्कुरेच्या पुड्यात निघालेल्या शिट्टीसाठी दोन भावांत भांडण झालं, यात एकाने रागात विषारी औषध प्राशन केले होते. घरच्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी उपचारासाठी जिल्हारुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान सदरील मुलाचा मृत्यु झाला. 

वडवणी तालुक्यातील डुकडेगाव येथील घटना

गणेश बाळू पवार आणि राजेश बाळू पवार या दोन भावानी २ दिवसांपूर्वी दुकानावरुण कुरकुरेचा पुडा आणला होता. यात एक शिट्टी निघाली होती. या शिट्टीच्या कारणावरुण दोघा भावात भांडण झाले. 

या भांडणातून १२ वर्षाच्या गणेश पवार याने विषारी औषध प्राशन केले,  त्याला उपचारा दरम्यान जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते . उपचारा दरम्यान त्याचा आज मृत्यु झाला आहे