लोटे एमआयडीत रासायनिक कारखान्यात स्फोट

 रत्नागिरीतील लोटे एमआयडीत घरडा रासायनिक कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसरात धुराचे लोट दिसून येत आहे. कारखान्यातील भट्टीमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

Updated: Jul 28, 2016, 05:01 PM IST
लोटे एमआयडीत रासायनिक कारखान्यात स्फोट title=

मुंबई :  रत्नागिरीतील लोटे एमआयडीत घरडा रासायनिक कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसरात धुराचे लोट दिसून येत आहे. कारखान्यातील भट्टीमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

लोटे औद्योगिक वसाहतीतील घरडा रासायनिक कारखान्यामध्ये गुरुवारी दुपारी भीषण स्फोट झाला. स्फोटामुळे परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गापासून जवळच हा कारखाना असल्याने महामार्गावरूनही धुराचे लोट दिसत होते.

दरम्यान, या स्फोटात कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून, आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरू  होते.. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.