अकोला : येथील किडनी रॅकेटचा प्रमुख आरोपी शिवाजी कोळी याला पोलिसांनी अटक केलीय. रॅकेटचा पर्दाफाश झाल्यापासूनच शिवाजी कोळी फरार होता. १४ डिसेंबरपर्यंत कोळीला पोलीस कोठडी ठोठावण्यात आलेय. दरम्यान, कोणाला माहिती कळू नये म्हणून श्रीलंकेत जाऊन किडनी काढण्याचे काम कोळी करत होता.
अधिक वाचा : अकोला किडनी रॅकेट, मुख्य आरोपी जाळ्यात
अकोल्यात अनेक शेतकऱ्यांनी कर्ज परतफेडीसाठी आपल्या किडन्या स्वस्तात विकल्याचं पुढे आले आहे. दरम्यान, अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारा किडनी रॅकेटचा प्रमुख आरोपी शिवाजी कोळी याला पोलिसांनी अटक केली. अखेर काल रात्री उशिरा त्याला अकोला पोलिसांच्या हाती लागलाय.
आज शिवाजी कोळीला कोर्टात हजर करण्यात आलंय. अकोल्यात अनेक शेतकऱ्यांनी कर्ज परतफेडीसाठी आपल्या किडन्या स्वस्तात विकल्याचं पुढे आलंय. पैशाच्या निकड असणाऱ्या शेतकऱ्यांना गळाला लावून त्यांना श्रीलंकेत घेऊन जाणं, आणि किडन्या काढण्याच्या सगळ्या कारवाईत शिवाजी कोळीची प्रमुख भूमिका असल्याचं बोललं जातंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.