विजयी उमेदवारांना अज्ञात स्थळी पाठवण्यास सुरुवात

 कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा निकाल लागला आणि आता घोडे बाजाराला उत आलाय. कारण नियमानुसार ११ नोव्हेबंर पर्यंत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर महापौर बसवणे गरजेचे आहे. पण १० नोव्हेंबरला रविवार आणि ११ नोव्हेंबर पासून दिवाळी सुरु होत असल्याने ६ नोव्हेबंर रोजी बहुमत सिद्द करुन महपौर पदासाठी सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी सुरु केलीये. 

Updated: Nov 2, 2015, 09:19 PM IST
विजयी उमेदवारांना अज्ञात स्थळी पाठवण्यास सुरुवात  title=

अजित मांढरे, झी मीडिया कल्याण :  कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा निकाल लागला आणि आता घोडे बाजाराला उत आलाय. कारण नियमानुसार ११ नोव्हेबंर पर्यंत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर महापौर बसवणे गरजेचे आहे. पण १० नोव्हेंबरला रविवार आणि ११ नोव्हेंबर पासून दिवाळी सुरु होत असल्याने ६ नोव्हेबंर रोजी बहुमत सिद्द करुन महपौर पदासाठी सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी सुरु केलीये. 

त्रिशंकू समिकरणामुळे आता उमेदवार पळवा पळविला सुरुवात झाली असून, भाजप आपल्या उमेदवारांसह संघर्ष समितीच्या उमेदवारांना अज्ञातस्थळी नेणारेये तर, मनसेने आपल्या ९ नगरसेवकांसह १ पुरुस्कृत उमेदवाराला दादर येथे राज ठाकरेंच्या भेटीला घेवून जाणार आहेत आणि तिथून १० उमेदवारांना देवदर्शनाला जाण्याच्या तयारीला मनसे लागलीये. 

तर दुसरीकडे शिवसेने तर दोन अपक्ष उमेदवार आपल्या गळाला लावले असून त्यांना शिवसैनिकांच्या सरंक्षणात अज्ञात स्थळी पाठवले गेले अाहे. शिवाय इतर अपक्ष नगरसेवकांना गळाला लावण्या करता मास्टर प्लान शिवसेनेचे नेते बनवण्यात व्यस्त आहेत. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पळवलेल्या नगरसेवकांना अज्ञात स्थळी घेवून जाण्याची जबाबदारी आमदार प्रताप सरनाईक, खासदार राजन विचारे आणि कोकणातील काही आमदारांवर सोपवण्यात आलीये. शिवसेना आपल्या उमेदवारांना कोकण दर्शन घडवणारेये.

शिवसेना ला ५२ जागा मिळाल्या आहेत तर ३ शिवसेना पुरुस्कृत उमेदवार निवडून आलेत आणि २ अपक्ष उमेदवार शिवसेने गळाला लावलेत. त्यामुळे अजून ५ नगरसेवकांची जुळवा जुळव शिवसेनेला करायची आहे.

तर भाजप ला ४२ जागा मिळाल्या असून,  ३ संघर्ष समिती आणि ३ भाजप पुरुस्कृत नगरसेवकांना घेवून भाजप नेते अज्ञात स्थळी जाणारेत. तर सत्ता स्थापन करण्याकरता अजून १४ जागांची जुळवा जुळव भाजपला करायचीये.

या सगळयात मनसेला खूप महत्व आल्याने मनसेच्या विजयी उमेदवारांना घेवून मनसेने नेते एकविरा देवी आणि शिर्डी देवदर्शनाला जाणार असल्याची माहिती मिळालीये

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.