राजकीय पटलावर श्री तशी सौ... पाहा, केडीएमसीतल्या जोड्या!

कडोंमपा निवडणुकीत घराणेशाहीबरोबरच आणखीही काही उल्लेखनीय गोष्टी पाहायला मिळाल्यात. या निवडणुकीत तब्बल चार जोडप्यांनी निवडणुकीत विजय मिळवलाय. 

Updated: Nov 2, 2015, 05:43 PM IST
राजकीय पटलावर श्री तशी सौ... पाहा, केडीएमसीतल्या जोड्या! title=

कल्याण : कडोंमपा निवडणुकीत घराणेशाहीबरोबरच आणखीही काही उल्लेखनीय गोष्टी पाहायला मिळाल्यात. या निवडणुकीत तब्बल चार जोडप्यांनी निवडणुकीत विजय मिळवलाय. 

मोरे पती - पत्नी
शिवसेनेकडून प्रभाग क्रमांक ७६, रघुवीर नगर - संगीतावाडीमधून राजेश मोरे तर प्रभाग क्रमांक ७७ दत्तनगरमधून भारती मोरे हे दाम्पत्य निवडून आलंय. 

धात्रक पती - पत्नी
भाजपकडून उमेदवार प्रभाग क्रमांक ६० गणेश मंदिर एव्हरेस्ट सोसायटी इथून मनिषा धात्रक आणि ६१ विष्णूनगर इथून शैलेश धात्रक हे जोडपं निवडून आलंय. 

भोईर पती - पत्नी
मनसेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भोईर दाम्पत्यानंही विजय पटकावलाय. प्रभाग क्रमांक ५२ सरोज भोईर आणि प्रभाग क्रमांक ५६ गावदेवी मंदीर इथून प्रकाश भोईर निवडून आलेत. 

तरे पती - पत्नी 
कडोंमपाच्या खडेगोळवली प्रभाग क्रमांक १०४ इथून मोनाली तरे आणि नेहरु नगर, प्रभाग क्रमांक ९५ इथून विक्रम तरे हे दाम्पत्य भाजपच्या तिकिटावर निवडून आलंय.

पाहा संपूर्ण निकाल

कडोंमपा निवडणूक: पाहा प्रभाग क्रमांक १ ते २९ चा निकाल

कडोंमपा निवडणूक: पाहा प्रभाग क्रमांक ३० ते ६० चा निकाल

कडोंमपा निवडणूक: पाहा प्रभाग क्रमांक ६१ ते ९० चा निकाल

कडोंमपा निवडणूक: पाहा प्रभाग क्रमांक ९१ ते १२२ चा निकाल

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.