कल्याण : कल्याण डोंबिवलीकरांची कल्याण शीळ रस्त्यावर होणाऱ्या ट्रॅफीक कोंडीतून सुटका होणार आहे. महापालिकेने धडक कारवाई करत रस्ता रूंदीकरणासाठी पाडकाम सुरू केलं असतानाच गोविंदवाडी बायपास या रखडलेल्या भागाचं कामही अंतिम टप्प्यात आलं आहे.
पत्री पूल ते दुर्गाडी किल्ला या केवळ चार किलोमीटरच्या रस्त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागला. अनेक कारणांनी हा रस्ता रखडला होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि आयुक्त ई रविंद्रन यांच्या धडाकेबाज कामामुळे अखेर जवळपास 90 टक्के काम पूर्ण झालं आहे.
महापौर राजेंद्र देवळेकर यांनी आज या कामाची पाहणी करत उरलेलं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश ठेकेदाराला दिलेत. येत्या पंधरवड्यात हा रस्ता सुरू होण्याची शक्यता आहे.